-
EP-46 | M/S हरी गणेश साने | यशस्वी उद्योजक | ८७ वर्ष जुना ब्रँड | जयंत साने आणि मानसी साने on Vibrant Mind Pod
- 2025/01/25
- 再生時間: 39 分
- ポッドキャスト
-
サマリー
あらすじ・解説
EP-46 | M/S हरी गणेश साने | यशस्वी उद्योजक | ८७ वर्ष जुना ब्रँड |
भेटूया श्री जयंत साने आणि त्यांच्या स्नुषा सौ मानसी साने
८७ वर्ष जुना ब्रँड आज तसाच यशस्वीरित्या चालू ठेवणे हे सोपे काम नव्हे. यांना भेटल्यावर खरोखर मनात येतं,
जुनी माणसं, जुना ब्रँड
सच्ची माणसं, सच्चा ब्रँड
हरी गणेश साने यांनी साध्या सतरंजीपासून सुरुवात करत बेडशीट, सोलापुरी चादरी, रजई, दोहर, गालिचे असे सर्व प्रॉडक्ट्स त्यांच्या छोट्याश्या दुकानात विकायला ठेवले. उत्तम क्वालिटी, आपलेपणाने केलेली ग्राहक सेवा आणि अतिशय रास्त दर यामुळे साने हा ब्रँड अल्पवधित पुण्यात प्रसिद्ध झाला आणि चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीस पडला. रिपीट कस्टमर हे बहुतांश व्यवसायिकांचे ध्येय असते. साने यांच्याकडे गेल्या ८७ वर्षांत पिढ्यानपिढ्या खरेदी करणारे ग्राहक आहेत.
अत्यंत चांगली सेवा देत विश्वासार्हता कमावलेला हा ब्रँड आज त्यांची तिसरी पिढी चालवते आहे. मानसी साने, हरी गणेश साने यांची नातसून त्यांचं पौड रोड वरील दुकान सांभाळते.सध्याची आवड लक्षात घेता नवीन डिझाईन्स, इंडिगो, बाटीक प्रिंट, लेटेस्ट प्रिंटमधील मऊ रजया असे सर्व काही त्यांच्या दुकानात मिळते.
Watch complete video episode here
https://www.youtube.com/channel/UCW4B9iaXIpb-MvQeFZPGn6w
https://maps.app.goo.gl/iY6bMs6A2s9tAmM87