エピソード

  • # 1605: आपले विचारच आपल्याला घडवतात...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/10/23

    अमेरिकेत एका कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा द्यायची असते. त्याच्यासमोर एका पिसाळलेल्या कुत्र्याला विषारी इंजेक्शन देण्यात आले. तो कुत्रा तडफडून मरण पावला.
    मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या या कैद्यासमोरच हे सर्व घडत असल्याने त्याच्या मनात त्या इंजेक्शनचे विचार सुरू झाले.
    त्यानंतर त्या कैद्याला तिथेच ग्लुकोजचे साधे इंजेक्शन दिले गेले. मात्र, दोन तासातच तो मृत्युमुखी पडला व पोस्टमार्टेममध्ये त्याच्या शरीरात विषनिर्मिती झालेली दिसली.
    याचे कारण त्या कैद्याने आपल्यालाही विषारी इंजेक्शन दिल्याची कल्पना केली आणि त्यातून ग्लुकोजच्या इंजेक्शन नंतरही त्याच्या शरीरात विषारी स्रावांची निर्मिती झाली. त्यामुळे त्याच्या हृदयावर ताण येऊन त्याचा मृत्यू ओढवला.

    続きを読む 一部表示
    7 分
  • # 1604: ह्रदयी धरा हा बोध खरा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/10/22

    प्रमाणापेक्षा जास्त वजनाच्या लोकांना शरीर मूकपणाने परंतु टाहो फोडून सांगतेय की कशाला मला शरीराचे अतिरिक्त वजन उगीचच अहोरात्र उचलायला सांगताय!
    हृदयाला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही असं केलं तरच आपल्या हृदयाचं आणि आपल्या आरोग्याचे रक्षण होईल.
    हृदय आयुष्यभर नृत्य करीत असते आणि त्या नृत्यात फक्त दोनच स्टेप असतात. एक आकुंचन आणि दुसरी शिथिलन! केवळ नृत्याच्या या दोन स्टेपमध्ये संपूर्ण आयुष्याला तोलून धरणारे जगात दुसरे नृत्य नाही आणि जगात असा दुसरा नर्तकही नाही! त्याला आपल्या तालावर नाचवू नका. त्याला त्याच्या नैसर्गिक तालावर नाचू द्या.

    続きを読む 一部表示
    11 分
  • # 1603: देवदूत. लेखक : अज्ञात. कथन: (सौ. निता दिनेश प्रभू. )
    2024/10/21

    "झाकण निघालेल्या मैनहोल मधे कुणी पडू नये म्हणून भर पावसात पहाटे पासून उभा असलेला माणूस, रस्त्यावरच्या उन्हात कालनिर्णय विकणाऱ्या म्हाताऱ्याचा फायदा व्हावा म्हणून सगळे कालनिर्णय घेणारा परप्रांतीय, भिकाऱ्या साठी एक कप चहा काढून ठेवणारा चहावाला, कुणाचे तरी प्राण वाचावेत म्हणून रक्तदानाच्या रांगेत उभे असणारे नोकरदार, तरुण मुलांचे जीव वाचवण्यासाठी आपल्या शेतात गुहेतील पाणी सांडू देणारा गरीब शेतकरी ..असे असंख्य देवदूत आपल्या आजूबाजूला असतात फक्त त्यांना बघण्या साठी नजर स्वच्छ हवी "

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1602: अन्नपूर्णा. लेखक :कल्याणी पाठक. कथन : (सौ निता दिनेश प्रभू. )
    2024/10/20

    " आत्ताच्या काळातल्या स्त्रिया स्वतंत्र आहेत, सुखी आहेत , चांगलं चुंगल खायला मिळत मग आता सवाष्णी ला आणि घरच्या पुरुष मंडळी ना गरमा गरम जेवण वाढून , स्वतः भुकेल्या राहून मग उरलेलं सगळ थंड जेवण संपवायचं हा अट्टाहास का? आपण अन्नपूर्णा आहोत च तर आपण ही आपल्या घरात लक्ष्मी सारखं जेवू या"

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1601: गावकऱ्यांचा डाव. लेखक शेखर गायकवाड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)
    2024/10/19

    त्या काळामध्ये शाळा कमी होत्या . मुलांना शाळेसाठी दहा ते पंधरा किलोमीटर पायी जावे लागत असे. गावकऱ्यांनी सदानंद गळ घातली आणि त्याने आपल्या सव्वाशे एकर जमिनीपैकी 40 एकर जमीन 1991 मध्ये गावाला शाळा काढण्यासाठी म्हणून दान दिली.

    तब्बल 40 ते 50 वर्षे मैदान आणि शाळेची इमारत एवढे वगळता 22 एकर जमीन पडीक पडली. त्या जागेवर नंतर ग्रामदैवतेची मोठी यात्रा भरू लागली. गावात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली आणि हायस्कूल बंद झाले. ३०-४० वर्षानंतर दान केलेली जमीन गावाच्या मालकीची झाली!......


    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1600: आणि शब्दच मुके झाले. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)
    2024/10/15

    माजोरडी वाटून रागानेच म्हटले...
    " तो वडापाव मी विकत घेऊन दिला होता, आणि तू कुत्र्याला घातला?"
    विश्वातील साऱ्या भावना कोळून प्यायल्याच्या शांततेत ती म्हणाली,_
    "माझं एकच हाये, तिची चार चार पोरं भुकेली हायेती..."

    続きを読む 一部表示
    1 分
  • # 1599: गरजवंताला अक्कल नसते. लेखक -अनामिक कथन : (डॉ. गीतांजली राव )
    2024/10/13

    लहानपणापासून आपण अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. प्रत्येक गोष्टीतून आपलं मनोरंजन झालं आहेच. शिवाय त्यातून काहीतरी नवीन कळलंय. आपल्या ज्ञानात भर पडली आहे. पण कर भरणे, आणि फटके खाण्यात वेळ घालवणे हे काय......!

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1598: वेंकटरमणा... गोविंदा..!! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/10/12

    ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रसाद आणि ट्रस्टी मनातल्या मनात विचार करत होते, “आम्ही काय गुन्हा केला आहे?” , “परमेश्वराने आमचा आक्रोश का नाकारला?” आता आपण जगाला आणि स्वतःला कोणता चेहरा दाखवू?
    इतक्यात श्री प्रसादांच्या कपाळावर पाण्याचे दोन-तीन थेंब पडले...
    घामाचे थेंब असावेत असा विचार करून ते मोठ्या निराशेने मंदिराकडे वाटचाल करत राहिले, पण तेवढ्यात आणखी पाच-सहा थेंब पडले.
    त्यांनी डोकं वर केलं, तेव्हा आकाशात काळे, पाण्याने भरलेले ढग दिसायला लागले होते, आणि गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाला.
    दोन-तीन सेकंदात जोरदार पाऊस सुरू झाला!
    लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, पाऊस फक्त तिरुपतीच्या डोंगराळ भागात पडला, आजूबाजूच्या भागात पाण्याचा एक थेंबही पडला नाही. गोगरभम जलाशय व परिसरातील विहिरी काठोकाठ भरून वाहू लागल्या. अभियंत्यांनी लगेच येऊन वर्षभर पाणीपुरवठ्याची चिंता नसल्याचे सांगितले.

    続きを読む 一部表示
    11 分